Free vaccination : वेल्हे तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनावरांचे मोफत लसीकरण

एमपीसी न्यूज : तालुक्यातील प्रत्येक गाव व वस्ती वर असणा-या शेतकरी बांधवांच्या जनावरांचे लम्पी या साथीच्या रोगाचा प्रतिबंध होण्यासाठी मोफत लसीकरण (Free vaccination) करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कात्रज, पुणे व वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत लसीकरण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याची सुरुवात तालुक्यातील विंझर या गावातील दुध उत्पादक शेतकरी संस्थेचे माध्यमातून करण्यात आली.

विंझर या गावातील मारुती मंदिरात या गावातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ग्रामस्थांनी पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ कात्रज, पुणेचे  संचालक भगवानराव पासलकर, वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  संतोषभाऊ रेणुसे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे काॅगेस पक्षाचे उपाध्यक्ष, किरणभाऊ राऊत आदी उपस्थितींचा सत्कार केला.

या कार्यक्रमात डाॅ.विनायक खळदकर यांनी लम्पी या साथ रोगा विषयी सोप्या भाषेत शेतक-याना सविस्तर माहिती दिली. डाॅ. सुनिल भेलके यांनी मार्गदर्शक केले.(Free vaccination) पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कात्रज,पुणे. या संस्थेचे कार्यक्षम विद्यमान संचालक  भगवानराव पासलकर यांनी आपल्या भाषणात शेतकरी बांधवांना आपणाकडे ऊत्पादीत होणारे गाय, म्हैस यांचे दुध संघाला पुरवठा करण्याचे आव्हान केले./

 

Women empowerment rally : महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन

गाय व म्हैस यांच्या दूधाला दुध संघ खाजगी दुध व्यावसायिक यांंच्या पेक्षा अधिक दर देत आहे. दुध संघाने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे पशुखाद्य कारखाना सुरू केला आहे. इतर पशुखाद्यापेक्षा सकस व स्वस्त पशुखाद्य पुरवठा शेतकरी बांधवांना करते याचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा आसे अहवाण केले.(Free vaccination) जनावरांना रोग प्रतिबंधक औषधे, कृमीनाशक औषधे, बी-बियाणे, मुरघास या बाबत सविस्तर मार्गदर्शक केले. वेल्हे तालुक्यातील ज्या गावातील जनावरानां लस देण्याची मागणी होईल त्या प्रत्येक गावात डॉक्टर जातील व मोफत लसीकरण करण्यात येईल असे तालुका अध्यक्ष संतोषभाऊ रेणुसे यांनी सांगितले.

या समारंभाला विंझर या गावातील दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन व माजी सरपंच शिवाजीदादा भोसले, अंत्रोली येथील जखनीमाता सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन रघुनाथ राऊत, पाल सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन अनंताभाऊ खाटपे, कोंडगाव सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन संजयभाऊ दारवटकर, सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन किसनराव करंजकर, (Free vaccination) सामाजीक कार्यकर्ते नारायणराव डींबळे, जेष्ठ पत्रकार शांताराम ठाकर, विंझर गावचे शेतकरी रामदास भोसले, विंझर ग्रामपंचायतचे उपसरपंच राहूल सगर, विंझरचे माजी सरपंच संभाजी भोसले , वसंत (बापू)पवार, श्रीराम भोसले, अशोक निम्हण, डाॅ. भरत भोसले, सुहास भोसले, रामदास निम्हण, शरद भोसले, रामदास भोसले, महादेव भोसले, शिवाजी भोसले , संदीप भोसले, योगेश सागर, नारायण भोसले, अनिल भोसले, संताजी भोसले, रामदास लिम्हण, संजय गायकवाड , आंनता गायकवाड, महादेव लिम्हण, सदाशिव सागर, मधुकर सागर, अमोल भोसले, प्रमोद गायकवाड, यश भोसले, रवींद्र दिघे, रोहिदास भोसले, सनी पंडित, अक्षय पवार, संदीप लिम्हण,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.