Pune : पुणे रेल्वे मंडळातील 51 स्थानकांवर मोफत वाय-फाय

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे मंडळातील 51 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. तर आणखी सहा स्थानकांवर वाय-फाय बसविण्याचे काम सुरु आहे.

पुणे रेल्वे मंडळातील पुणे, उरुळी, हडपसर, लोणी, यवत, केडगाव, पाटस, सासवड रोड, फुरसुंगी, आळंदी, शिंदवणे, आंबले, दौंडज, वाल्हा, सालपा, अदरकी, जरंडेश्वर, रहीमतपूर, तारगांव, मसूर, शिरवडे, शेणोली, भवानीनगर, ताकारी, किर्लोस्करवाडी, नांद्रे, जयसिंगपूर, रुकडी, कोल्हापूर, वळीवडे, हातकणंगले, मिरज, सांगली, भीलवडी, कराड, कोरेगांव, सातारा, पलसी, वाठार, निरा, लोनंद, जेजुरी, राजेवाड़ी या ४३ स्थानकांवर वाय-फाय सुविधा देण्यात आली आहे.

मळवली सेक्शनमध्ये शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, आकुर्डी, देहूरोड, मळवली या आठ इन 8 स्थानकांवर मोफत वाय -फाय सेवा उपलब्ध करण्यात आली असून चिंचवड, वडगाव, कामशेत, तळेगाव, घोरावडी, बेगडेवाडी या सहा स्थानकांवर वाय-फाय बसविण्याचे काम सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.