_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : कोरोनाविरोधात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत योगा प्राणायाम शिबीर

Free yoga pranayama camp to boost immunity against corona : पाच दिवस कालावधीचे ऑनलाईन शिबीर

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोहम योग साधना या संस्थेतर्फे येत्या सोमवार (दि. 3) ते शुक्रवार (दि. 7) असे पाच दिवस मोफत ऑनलाईन योगा प्राणायाम शिबिर आयोजित केले आहे.

सायंकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत हे शिबीर होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख दिगंबर उचगावकर यांनी दिली.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यामुळे विनाकारण घबराट निर्माण होताना दिसते. यातून रुग्ण बरे होतात. दैनंदिन योगा व प्राणायाम करणाऱ्यांना त्याचा अधिक फायदा होताना दिसतो.

_MPC_DIR_MPU_II

शरिरात प्राणवायूचे प्रमाण कमी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही चांगली राहते, असे निरीक्षण आहे.

ज्यांना शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोहम योग साधना या नंबरवर (मोबाईल – 9766682828) संपर्क साधावा.

जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभा घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रमुख उचगावकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.