Hadpsar : स्वातंत्र्य सेनानी दिनदयाळ वर्मा यांनी वयाच्या 90 व्या वर्षीही बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – आम्ही तुमच्या हक्कासाठी लढलो, आता तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजवा, असे आवाहन हडपसर येथील स्वातंत्र्य सेनानी दिनदयाळ वर्मा यांनी केले. दीनदयाळ वर्मा हे 90 वर्षाचे असून त्यांच्या पत्नी कांता वर्मा या 80 वर्षाच्या आहेत. या वयातही त्यांनी प्रचंड उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी ते म्हणाले की, माझा जन्म युपी मधील एका गावामध्ये झाला. पण नंतर काही कामानिमित्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा झालो. मला सुरुवातीपासून अन्याय विरोधात लढण्याची सवय असल्याने संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती संग्राम या लढ्यात देखील सहभागी झालो. या लढ्यात काही महिन्याचा कारावास देखील भोगावा लागला. तसेच मी पाहिल्या लोकसभेपासून प्रत्येक निवडणुकीत मतदान आजअखेर करीत आलो आहे. त्यांनी मतदानाचा हक्क बजावून आताच्या पिढीला मतदानाचे महत्व पटवून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.