-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : लग्नाचे वचन देऊन अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाकडून वारंवार बलात्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : लग्नाचे वचन देऊन एका 19 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर वारंवार बलात्कार केला. पीडित तरुणीचे नग्नावस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर खडक पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. 

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने पीडित मुलीला वेळोवेळी लग्न करण्याचे वचन दिले आणि तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यानंतर या संबंधाबाबत मित्र-मैत्रिणींना आणि पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सांगण्याची धमकी देऊन त्याने पीडित मुलीला अश्लील आणि नग्नावस्थेतील फोटो व्हिडिओ पाठवण्यास भाग पाडले. व त्यानंतर हेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित तरूणीवर जबरदस्तीने नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केला.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.