Friends Cricket Club : प्रफुल्ल मानकरच्या शतकी खेळीमुळे फ्रेन्डस् क्रिकेट क्लबचा दुसरा विजय!

एमपीसी न्यूज : एजीएएस मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘मान्सुन लीग’ (Friends Cricket Club) अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत आयोध्या वॉरीयर्स संघाने सलग दुसरा तर, प्रफुल्ल मानकरच्या शतकी खेळीमुळे फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. एलके इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रफुल्ल मानकर याच्या नाबाद 115 धावांच्या जोरावर फ्रेन्डस् क्रिकेट क्लबने सुप्रिम इलेव्हनचा 195 धावांनी पराभव केला. प्रफुल्ल मानकरने 47 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 115 धावा फटकावल्या. यासह श्रीनिवास सरवदे (51 धावा) आणि हृषीकेश आगाशे (31 धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने 20 षटकात 253 धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना सुप्रिम इलेव्हनचा डाव 58 धावांवर गडगडला.


गौरव धनवटे याच्या अष्टपैलू खेळीमुळे एलके इलेव्हन संघाने माईटी ईगल्स् इलेव्हनचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माईटी ईगल्स् इलेव्हनने 20 षटकामध्ये 174 धावा चोपल्या. यामध्ये ओम साळुंखे याने 74 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना एलके इलेव्हन संघाने सावध सुरूवात केली. गौरव धनवटे (48 धावा), कुणाल गुप्ता (37 धावा) आणि शंतनु आठवले (41 धावा) यांच्या फलंदाजीमुळे 19.3 षटकामध्ये व 5 गडी गमावून पूर्ण केले.

Yoga Day :  योग दिन उत्साहात साजरा

विनायक शिंत्रे याच्या भेदक गोलंदाजीच्या (Friends Cricket Club) जोरावर आयोध्या वॉरीयर्स संघाने जोशी स्पोर्ट्स संघाचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जोशी स्पोर्ट्स संघाने गणेश जोशी याच्या 34 धावांमुळे 20 षटकात 125 धावा धावफलकावर लावल्या. विनायक शिंत्रे याने 29 धावात 4 गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. हे आव्हान आयोध्या वॉरीयर्सने 17.3 षटकात व 5 गडी गमावून पूर्ण केले.  शंतनु गांधी (47 धावा) आणि अनुज देशपांडे (नाबाद 43 धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने सलग दुसरा विजय मिळवला.


सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरी

फ्रेन्डस् क्रिकेट क्लबः 20 षटकात 6 गडी बाद 253 धावा (प्रफुल्ल मानकर नाबाद 115 (47, 14 चौकार, 6 षटकार), श्रीनिवास सरवदे 51, हृषीकेश आगाशे 31, शोएब खान 2-55) वि.वि. सुप्रिम इलेव्हनः 12.3 षटकात 10 गडी बाद 58 धावा (प्रकाश पाटील 27, सचिन कापडे 5-12, उमेश शिंदे 2-19); सामनावीरः प्रफुल्ल मानकर;

माईटी ईगल्स् इलेव्हनः 20 षटकात 8 गडी बाद 174 धावा (ओम साळुंखे 74 (57, 9 चौकार, 2 षटकार), गोराक्क्ष जाधव 29, गौरव धनवटे 3-30, श्रीकांत मारटकर 3-34) पराभूत वि. एलके इलेव्हनः 19.3 षटकात 5 गडी बाद 180 धावा (गौरव धनवटे 48, कुणाल गुप्ता 37, शंतनु आठवले 41, तुशार क्षिरसागर 2-36); सामनावीरः गौरव धनवटे;

जोशी स्पोर्ट्सः 20 षटकात 9 गडी बाद 125 धावा (गणेश जोशी 34, साहील भामे 13, विनायक शिंत्रे 4-29, हृषीकेश बडवे 2-17) पराभूत वि. आयोध्या वॉरीयर्सः 17.3 षटकात 5 गडी बाद 128 धावा (शंतनु गांधी 47 (28, 3 चौकार 2 षटकार), अनुज देशपांडे नाबाद 43 (34, 7 चौकार), अजिंक्य देशमुख 3-22); सामनावीरः विनायक शिंत्रे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.