Talegoan : फ्रेंड्स ऑफ नेचर तळेगाव दाभाडे च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची कार्यशाळा

एमपीसी न्यूज – ​आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव पूर्वीपासून चालत आलेला आपला हा सण म्हणजे आनंद आणि भक्तीचा संगम पण आता हा सण पूर्वीसारखा पर्यावरण पूरक राहिलेला नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
गेले काही वर्षं आपण बघत आहोत की गणपती बाप्पाच्या मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जात आहेत आणि त्यांना वापरण्यात येणारे रंग हे सुद्धा कृत्रिम आहेत, त्यामुळे ह्या मूर्ती पर्यावरण पूरक ठरत नाहीत.

अशा मूर्तीं पाण्यात विसर्जन केल्यानंतरही बराच काळ तशाच राहतात आणि सहजासहजी त्यांचे विघटन होत नाही आणि त्यामुळेच पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढते. या प्रदूषणाचा त्रास पाण्यातील जीवांना अधिक होतो. यावर उपाय म्हणून तळेगाव दाभाडे येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडणारा एक मनस्वी तरुण प्रसाद सिंदगी याने माती, शेण, तुरटी यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे उत्पादन सुरु केले आहे. त्याची प्रात्यक्षिकासह  कार्यशाळा आणि स्लाईड शो चे आयोजन  फ्रेंड्स ऑफ नेचर च्या निसर्ग अभ्यासिकेत केले होते.पाउस असूनही कार्यशाळेला चांगली उपस्थिती होती सिंदगी यानाच्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींना परदेशातूनही चांगली मागणी आहे तळेगावात मात्र फारसा प्रतिसाद नसल्याची खंत प्रसाद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमित पोतदार,सुनील गोडसे केदार गोरे,विवेक रामायणे,सुपर्णा गायकवाड-श्रेयाकर  यांनी परिश्रम घेतले

फ्रेंड्स ऑफ नेचर च्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी अशा प्रकारचे निसर्ग संवर्धन,पर्यावरण रक्षण व त्यास अनुसरून विविध विषयावरचे नॉलेजशेअरिंग चे कार्यक्रम आयोजित केले जातात अश्या प्रकारच्या कार्यक्रमात रुची असणाऱ्यांसाठी आणि असे नॉलेजशेअरिंग करण्याऱ्यांसाठी फ्रेंड्स ऑफ नेचरचे व्यासपीठ खुले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.