Pune Crime News : ब्लॅकमेल करत मित्राच्या पत्नीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – मित्राच्या पत्नीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बलात्कार करण्यात (Pune Crime News)आला. इतकेच नाही तर मित्राच्या पत्नीला लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी जबरदस्ती केली. पुण्यातील चंदन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा भावा बहीणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  यातील भावाला अटक करण्यात आली आहे. 39 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 2021 पासून वेळोवेळी हा प्रकार घडत होता.

Pune Crime News :’तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही’ म्हणत पत्नीचा छळ; पतीविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी  हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र आहे. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन करून “तू खूप आवडतेस,-तू मला खुश कर, माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली” तसेच अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पाठवून तुझी इज्जत भर रस्त्यावर आणेन तुझ्या तोंडावर ऍसिड टाकून (Pune Crime News) चेहरा विद्रूप करेन, तुझ्या मुलाला किडन्याप करीन अशी धमकी देऊन फिर्यादी यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.

तर आरोपीची बहीण असलेल्या महिलेने फिर्यादी यांना वारंवार फोन करून पैशाची मागणी केली. तसेच या महिलेने आपल्या भावासोबत लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहण्यासाठी धमकी देखील दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.