Baramati: फेसबुकवर महिलांशी आधी मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग; आता पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Baramati: Friendship with women on Facebook first, then blackmailing; Now the police have handcuffed him

एमपीसी न्यूज- महिला आणि मुलींना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर त्यांचे अश्लील छायाचित्र तयार करून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप सुखदेव हजारे (वय 29) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला दहिवडी येथून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश खरात या बनावट नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करून अनेक महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत.

एकदा मैत्री झाल्यानंतर फेसबुकवरील त्यांचे फोटो क्रॉप करून त्याजागी अश्लील फोटो लावून आरोपी संबंधित मुलींना ब्लॅकमेल करायचा. माझ्याशी बोल, मैत्री कर, नाहीतर हे फोटो व्हायरल करेन अशी धमकी द्यायचा.

दरम्यान, अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याने बारामती तालुका पोलिसांनी संबंधित अकाउंटचा तांत्रिक बाबीने तपास करत आरोपी हा संदीप हजारे असल्याचे निष्पन्न केले आणि त्यानंतर त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like