Bhosari : शॉर्टसर्किटमुळे हार्डवेअरच्या दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

एमपीसी न्यूज – शॉर्टसर्किट झाल्याने हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. ही घटना आज (रविवार, दि. 13)  पहाटे अडीचच्या सुमारास भोसरी येथे घडली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. 

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे अडीचच्या सुमारास भोसरी येथे एका हार्डवेअरच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये दुकानातील प्लास्टिकचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन विभागाचे दोन आणि भोसरी विभागाचा एक असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. मात्र आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.