Pune : उंड्रीत एमएनजीएलच्या पाइपलाइनला आग

अग्निशामक दलाच्या तात्काळ कारवाईने अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंड्री भागात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, उंड्री भागातील अाहिरा मंत्रा प्राेजेक्ट लगत एमएनजीएलच्या गॅस पाइपलाइनला अाग लागल्याचा फाेन सकाळी 11.45 सुमारास अाला. तात्काळ अग्निशामक दलाच्या तीन फायर गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात अाल्या. अग्निशामन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत 20 ते 25 मिनिटांमध्ये अाग अाटाेक्यात अाणली. सुदैवाने अाग जास्त न पसरल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. एमएनजीएलचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.