FASTag To Be Mandatory : फास्टॅगची तारीख जवळ आली आहे, या नंतर मुदत वाढ नाही

एमपीसी न्यूज: सर्व गाड्यांना 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे. पण यानंतर सरकारने याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. जी आता जवळ आली आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकाला 15 फेब्रुवारीनंतरही फास्टॅग न मिळाल्यास त्याला प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे.  

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी जाहीर केलं होतं की 1 जानेवारी, 2021 पासून टोल बूथवर रोख भरणा किंवा इतर कोणत्याही देय पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत. एनएचएआयच्या म्हणण्यानुसार, सध्याचा टोल पेमेंटमध्ये फास्टॅगचा हिस्सा सुमारे 75 ते 80 टक्के आहे जो सरकारला 100 टक्के करायचा आहे. यामुळे सरकार 15 फेब्रुवारीनंतर याची मुदत वाढवणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.