Eng Vs Pak: कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा जेम्स अँडरसन ठरला पहिला जलदगती गोलंदाज

From first to 600th, revisiting key milestone wickets in James Anderson's Test career कसोटी क्रिकेटमध्ये याअगोदर मुथय्या मुरलीधरन 800 बळी, शेन वॉर्न 708 बळी, अनिल कुंबळे 619 बळी घेतले आहेत.

एमपीसी न्यूज – पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने अखेरीस विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.

अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्रं पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतु, अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी खेळण्यायोग्य बनवली. खेळाडू मैदानात आल्यानंतर अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत 600 वा बळी घेतला.

इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. स्टुअर्ट ब्रॉड हा एकमेव इंग्लिश गोलंदाज या यादीत अँडरसनच्या मागे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये याअगोदर मुथय्या मुरलीधरन 800 बळी, शेन वॉर्न 708 बळी, अनिल कुंबळे 619 बळी घेतले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.