Mumbai: अरे बापरे! यापुढे केस कापण्यासाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये मोजावे लागणार

From now on, you will have to pay Rs 200 for a haircut and Rs 100 for a beard in maharashtra

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमुळे बऱ्याच काळापासून बंद असलेल्या सलूनमध्ये यापुढे केस कापण्यासाठी 200 रुपये तर दाढी करण्यासाठी 100 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्यातील सलून असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

यापुढे सलून मध्ये केस, दाढी करण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार असून ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.

राज्यातील सलून असोसिएशन घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे केस कापण्यासाठी प्रत्येकी दोनशे रुपये तर दाढी करण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत.

त्यामुळे लॉकडाऊनमध्ये जर तुम्ही केस आणि दाढी वाढवली असेल तर यापुढे केस आणि दाढी करण्यासाठी सलूनवाल्यांना तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.