Pune University News : यंदापासून विद्यापीठात ‘पी.जी.डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर’ अभ्यासक्रम

नवसंशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ठरणार फायदेशीर

एमपीसी न्यूज – उद्योग क्षेत्रात सुरू असणारे नवसंशोधन व व्यवसाय सुरू करताना लागणारे व्यवस्थापन कौशल्य याची सांगड घालणारा नवसंशोधन व नवोपक्रमातील पदव्युत्तर पदविका (पी.जी.डिप्लोमा इन इनोव्हेशन अँड न्यू व्हेंचर) अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून (2021-22) सुरु करण्यात येत आहे.

विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्रातर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम अहमदाबाद येथील आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणार आहे. याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी 6 महिन्यांचा असून हा चार विषयांवर आधारलेला 14 श्रेयांक असणारा अभ्यासक्रम आहे. विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेतील पदवी ग्रहण केलेला कोणताही विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. आलेल्या अर्जातून मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. हा अभ्यासक्रम ऑनलाईन-ऑफलाईन स्वरूपात असेल.

या अभ्यासक्रमात प्रामुख्याने इनोव्हेशन मॅनेजमेंट, कस्टमर सेन्ट्रीक इनोव्हेशन अँड प्रोडक्ट मॅनेजमेंट, लीगल अस्पेक्ट्स, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, आय.पी. मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग, मॅनेजिंग न्यू व्हेंचर हे विषय शिकवले जाणार आहेत.

हा अभ्यासक्रम उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने तयार केला आहे. भारतात येत्या काळात 3 हजार नवोपक्रम केंद्र उभारण्यात येणार आहेत. हा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी या केंद्रामध्ये काम करण्यास भविष्यात पात्र ठरतील. हा अभ्यासक्रम ऑनलाईन असल्याने विद्यार्थी कोणत्याही ठिकाणाहून यासाठी अर्ज करू शकतील, अशी माहिती केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाविषयी सर्व माहिती, शुल्क खालील संकेतस्थळावर मिळेल.

https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

अधिक माहितीसाठी संपर्क Whats app – ८९६५२२७७९६

प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकअर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2021निवड यादी जाहीर – 3 ऑगस्ट 2021प्रत्यक्ष मुलाखत – 4 ते 7 ऑगस्ट 2021अंतिम निवड यादी 10 ऑगस्ट 2021प्रवेश शुल्क – 10 ते 15 ऑगस्ट 2021अभ्यासक्रमास सुरुवात- 20 ऑगस्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.