IPL 2020 Playoffs : आजपासून प्ले – ऑफचा थरार, असे होतील सामने

एमपीसी न्यूज – आजपासून आयपीएलच्या प्ले – ऑफचा थरार रंगणार आहे. मुंबईने साखळी सामन्याअंती 18 गुणांसह अव्वलस्थान कायम राखलं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं. हैदराबादचे रनरेट जास्त असल्याने त्यांना तिसरं स्थान मिळालं आणि बंगळुरूला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.

* असे आहेत प्ले-ऑफचे सामने

5 नोव्हेंबर, गुरूवार – पहिली पात्रता फेरी 1 – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स

6 नोव्हेंबर, शुक्रवार – बाद फेरी – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

8 नोव्हेंबर, रविवार – दुसरी पात्रता फेरी – मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ  विरुद्ध हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता

10 नोव्हेंबर – अंतिम सामना – मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता विरुद्ध दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता

प्ले-ऑफ्सचे सर्व सामने भारतीय प्रमाणे वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.