Pimpri: उद्यापासून शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरु राहणार

unlock start tomorrow all shops open pimpri chinchwad city

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून लागू करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाउन आज संपला आहे. उद्यापासून  (शुक्रवार) शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5  या वेळेत  सुरु राहणार आहेत. तसेच क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने देखील खुली होणार आहेत.

 याबाबतची नियमावली आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जारी केली आहे.  

राज्य सरकारने 1 जुलै रोजी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात उद्यापासून ‘अनलॉक-2’ पद्धतीनेच  अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलै ते 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आज रात्री त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून अनलॉक  असणार आहे.

उद्यापासून हे सुरू राहणार

#सर्व बाजारपेठेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहणार.

#क्रीडा संकुले, स्टेडियम, पालिकेची मैदाने, उद्याने व्यायामासाठी सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत खुली राहणार.

#पीएमपीएमलच्या बसने सर्वांना प्रवास करता येणार.

#औद्योगिक आस्थापना 100 टक्के क्षमतेने सुरु.

#खासगी कार्यालये, माहिती तंत्रज्ञान विषयक 50 टक्के मनुष्यबळासह सुरु, शक्य असेल तोपर्यंत वर्क फ्रॉम होम.

#सरकारच्या आदेशानुसार केशकर्तनालये, ब्युटी पार्लर सुरु राहणार.

हे असणार बंद

#शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था.

#हॉस्टेल रेस्टारंट, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, बार, सभागृहे, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क.

#सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजने, सांस्कृतीक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने.

#सर्व धार्मिक स्थळे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.