Pune Crime : डीजे च्या आवाजाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीमची केली तोडफोड

एमपीसी न्यूज : डीजे च्या आवाजाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने थेट साऊंड सिस्टीमच फोडल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. (Pune Crime) या ज्येष्ठ नागरिकाने थेट लग्न समारंभात जाऊन वायर, मशीन, स्पीकर तोडून तब्बल 10 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. पुण्यातील कोंढवा खुर्द भागात बुधवारी ही घटना घडली. 

अब्दुल रिसालदार यांनी या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक सत्यबीर बंगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्च रोजी कोंढवा भागात असणाऱ्या कोरियंटल रिसॉर्ट अँड क्लब या ठिकाणी बॉलरूम मध्ये एक विवाह सोहळा संपन्न होत होता. (Pune Crime) विवाह समारंभ असल्यामुळे या ठिकाणी डी जे सिस्टीम लावण्यात आली होती. सत्यबीर बंगा यांचे घर या रिसॉर्ट पासून काही अंतरावर आहे.

Pimpri News : सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करावा – मराठा सेवा संघ

दरम्यान, या लग्न समारंभात सुरू असलेल्या डी जे साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास होत असल्याने बंगा यांनी थेट रिसॉर्ट मध्ये विनापरवानगी प्रवेश केला.(Pune Crime) ज्या ठिकाणी समारंभ सुरू होता त्या ठिकाणी त्यांनी जाऊन थेट सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या वायर तोडून टाकल्या. इतकचं काय तर रागाच्या भरात त्यांनी एल ई डी ऑपरेटरचा लॅपटॉप देखील फोडला आणि इतर सगळ्या वस्तूंचे नुकसान केले. या सगळ्या साऊंड सिस्टीम ची किंमत जवळपास 10 लाख रुपये होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगा यांचे घर या रिसॉर्ट पासून काही अंतरावर आहे. या आधी देखील त्यांनी अशा अनेक कार्यक्रमात जाऊन गोंधळ घातले आहेत

बंगा यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम 427, 452 अन्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.