Pune : अखेर एफटीआयआयचा बेपत्ता विद्यार्थी सापडला

निलंबित केल्यामुळे आलेल्या नैराश्यातून गेला होता निघून

एमपीसी न्यूज -एफटीआयआयमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थी मनोज कुमार हा 14 जानेवारीपासून इन्स्टिट्यूट कॅम्पसमधून बेपत्ता झाला होता. अखेर त्याचा पत्ता काल रविवारी (दि.20) सायंकाळी पोलिसांना लागला. तो त्याच्या उत्तरप्रदेश येथील जयसिंगपूरमध्ये त्याच्या मावशीकडे निघून गेला होता.

मनोज कुमार (वय 31 , रा. वाराणसी, उत्तरप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात मनोज बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती.

कुमार हा एफटी आयआयमध्ये आर्ट डिरेक्शन विभागात शिकत होता. त्याला प्राध्यापकाशी गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून तो त्याच्या मावशीकडे कोणालाही न सांगता निघून गेला होता. तो कुठे गेला हे कोणालाही माहीत नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली. पोलीस मनोजच्या पत्नीच्या संपर्कात होते. मनोजने त्याच्या पत्नीला त्याचा मोबाईल गहाळ झाल्याचे कारण सांगितले. त्याच्या पत्नीने पोलिसांना तो सुखरूप असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.