FTII Student Case : तीन दिवस मृतदेह सडत असताना कोणालाच कसे कळले नाही?

एमपीसी न्यूज :  पुण्यातील FTII मध्ये (FTII Student Case) शुक्रवारी एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अश्विन अनुराग शुक्ला (वय 32) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अश्विनने मंगळवारी आत्महत्या केली असावी असा कयास वर्तवला जात आहे. त्यामुळे आत्महत्या केल्यानंतर तीन दिवसानंतर हे याविषयी कुणालाच कसे कळले नाही. अश्विनच्या रूमशेजारीच इतर विद्यार्थी देखील राहतात. त्यांच्या देखील लक्षात हा प्रकार कसा आला नाही असा सवाल आता विचारला जात आहे. 

अश्विनला काही विद्यार्थ्यांनी मंगळवारी शेवटचे पाहिले होते. अश्विन हा मितभाषी होता. त्यामुळे तो एकलकोंडा स्वभावाचा होता. इतर विद्यार्थ्यांमध्ये तो जास्त मिसळत नसे. Ftii मध्ये सिनेमॅटोग्राफरच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्यामुळे अश्विन नसल्याचे कुणालाच कसे जाणवले नाही? या तीन दिवसात तो क्लासमध्ये गेला नव्हता का? हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात हा प्रकाराला नाही का? तीन दिवस मृतदेह सडत असताना कुणालाच याविषयी कसे कळले नाही? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Vijay Shivtare : बंडखोरीनंतर विजय शिवतारेंचा पहिला विजय, ग्रामपंचायत निकालात बाजी मारली

अश्विन हा मूळचा गोव्याचा होता. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. मागील तीन वर्षापासून तो पुण्यात राहत होता. परंतु, त्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच (FTII Student Case) त्याच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.