Fuel Price Hike: पेट्रोलियम कंपन्यांचा दणका, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Fuel Price Hike: Petrol-diesel price hike

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे भीतीच्या छायेत असलेल्या नागरिकांना आता दुसरा झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील पेट्रोलियम कंपन्यांवरही झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दरवाढ न करणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर 60 पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करात वाढ केली होती. त्यामुळे तिथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती.

मे महिन्यात केंद्राने उत्पादन शुल्क पेट्रोलवर 22.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 18.83 रुपये प्रति लीटर केले होते. त्याचवेळी जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर जरी कमी झाले होते. तरी त्याचा फायदा थेट ग्राहकांना मिळाला नव्हता.

मुंबईत नवे दर असे, पेट्रोल 78. 91 रूपये आणि डिझेल 69.79 रूपये, नवी दिल्लीत पेट्रोल 71.86 रूपये आणि डिझेल 69.99 रूपये, चेन्नईत पेट्रोल 76.07 रूपये आणि डिझेल 68.74 रूपये तर हैदराबाद येथे पेट्रोल 74.61 रूपये आणि डिझेल 68.42 रूपये असा दर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.