Pimpri: सहायक आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप

सहायक आयुक्त  खोराटेंकडे निवडणूक, लोणकरांकडे भांडार तर राऊत यांच्याकडे क्रीडा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांचा कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. त्यानुसार आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभाग, आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे भांडार विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर, ‘ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा दिली. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) जारी केले. 

निवडणूक आणि भांडार विभागाचा पदभार असलेले सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर एक महिन्याच्या प्रदिर्घ रजेवर गेले आहेत. त्यामुळे सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात फेरवाटप करण्यात आले आहे. आकाश चिन्ह परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि ‘ड’ कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी विजय खोराटे यांच्याकडे निवडणूक विभागाची जबाबदारी दिली आहे. ‘फ’ क्षेत्रिय आणि आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडील क्रीडा विभाग कमी करण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी असलेल्या ‘ह’ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांच्याकडे क्रीडा विभागाची धुरा देण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल केले आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.