Pune Railway : पुणे रेल्वे विभागाला अर्थसंकल्पात 1 हजार 132 कोटी रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज – केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (दि. 1) संसदेत (Pune Railway) सादर केला. यामध्ये महाराष्ट्रातील रेल्वे विभागाला 15 हजार 554 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातील 1 हजार 132 कोटी रुपये निधी पुणे रेल्वे विभागाला मिळाला आहे.

पुणे रेल्वे विभागातील बारामती ते लोणंद या 54 किलोमीटर, पुणे स्टेशनवर 24 ते 26 कोचची ट्रेन उभा करण्यासाठी व्यवस्था यासाठी 330 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून राज्यासह देशाच्या दररोज सव्वा लाखाहून अधिक प्रवासी पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे स्थानकाचा विस्तार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यात आला आहे.

Bhosari : महावितरणचा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची पट्टी व ऑईल चोरीला

पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच (Pune Railway) हडपसर टर्मिनल विकासासाठी हे दोन कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. नगर-बीड-परळी वैजनाथ या 250 किलोमीटर अंतरासाठी 275 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

रेल्वे मार्गाचे डबलिंग तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाच्या कामांमध्ये पुणे-मिरज-लोणंद या 467 किलोमीटरसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दौंड मनमाड डबलिंगच्या 247 किलोमीटर कामासाठी 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.