Pune News : पुणे व नागपूर विभागात कोरोना उपाययोजनांसाठी 38.58 कोटी रूपयांचा निधी

एमपीसी न्यूज – विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना कोरोना उपाययोजनांसाठी 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी वितरित करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त पुणे यांना 29 कोटी 96 लाख रूपये वितरित करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला 9 कोटी 44 लाख, सोलापूर जिल्ह्याला 10 कोटी, सातारा जिल्ह्याला 10 कोटी 52 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

तसेच, विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला 8 कोटी 61 लाख रूपये असा एकूण 38 कोटी 58 लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरित करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.