Pune : फुरसुंगी-उरुळी पुणे महापालिकेतून बाहेर, राज्य सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 34 गावांपैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वगळण्याचा निर्णय घेतला.(Pune) त्या बाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी काढले आहेत.

फुरसुंगी आणि उरळी देवाची या गावांची मिळून आता नगर परिषद होणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेतून ही दोन्ही गाव वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारकडून याबाबत नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

Lonavala : लायन्स पाॅईटच्या दरीत पडून युवकाचा मृत्यू

पुणे शहराच्या लगत असलेली 34 गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळी महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागील पाच वर्षाच्या काळात समाविष्ट गावामध्ये राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकाराच्या पायाभूत सुविधा देण्यात आल्या नाही. (Pune)त्यावरुन स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन देखील केली आहेत. मात्र त्या 34 गावांपैकी फुरसुंगी अणि उरुळी देवाची गाव वगळण्यात आली आहे.त्यामुळे आता तेथील गावामध्ये आगामी काळात राज्य सरकार मार्फत कशा प्रकारे पायाभूत सुविधा दिल्या जातात हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.