Gaafil Movie : ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च

चित्रपट 15 डिसेंबरला होणार प्रदर्शित

एमपीसी न्यूज –  दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके हे ‘गाफील’च्या माध्यमातून (Gaafil Movie ) प्रेक्षकांसमोर एक अनोखी कलाकृती आणत आहेत. या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले. हा चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भोंडला खेळ रंगला

चित्रपटाच्या ‘गाफील’ या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार या चित्रपटातून कलासृष्टीत पदार्पण करतील.

त्यामुळे ‘गाफील’ हा चित्रपट नक्की कसा असेल, समाज नक्की कशाबद्दल गाफील आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट असेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील. मात्र, त्यांना चित्रपट बघितल्यावरच याची खरी उत्तरं कळतील.

धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत. तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत.

मराठी प्रेक्षक नेहमीच चित्रपटसृष्टीकडून आगळ्या-वेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगळ्याच ढंगाची कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. असे अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतल्याची उदाहरणं आहेत.

यामुळे नवोदित दिग्दर्शकही काहीतरी नवीन, हटके विषयांवर सातत्याने कलाकृती घडवण्यासाठी तत्पर असतात. प्रेक्षकांची चांगल्या कलाकृतीची भूक ‘गाफील’ चित्रपट भागवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे (Gaafil Movie ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.