Brahmin Federation : गडकरी, जावडेकर आणि आता फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण – ब्राह्मण महासंघाचा आरोप

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी देखील पार पडला. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी सर्वांना आशा असताना ऐनवेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आलं आणि त्यांनी शपथ देखील घेतली. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री झाले. आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता भाजप विरोधात नाराजी वाढली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने तर भाजपनेच फडणवीस यांना ते केवळ ब्राह्मण (Brahmin Federation) असल्याने मुख्यमंत्री होऊ दिले नसल्याचा आरोप केलाय. 

 

Today Horoscope 2 July 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी हा खळबळजनक आरोप केला. गोविंद कुलकर्णी म्हणाले, हिंदुत्ववादी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आनंद झाला. कारण सतत ब्राह्मण (Brahmin Federation)  विरोधी वक्तव्य करणारे सरकार जाणे गरजेचे होते. परंतु भाजपने देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण केले आहे. फडणवीस यांनी सरकारमध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांचा हा निर्णय योग्यही होता. पण ऐनवेळी भाजपने त्यांच्यावर दबाव आणला.

याआधीही भाजपने मुद्दाम नितीन गडकरी यांच्यासोबत देखील असाच खेळ केला. पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून हटविण्यासाठी भाजपने गडकरी यांचे खच्चीकरण केले. त्यानंतर प्रकाश जावडेकर आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाजपने दबाव आणला, असा आरोप कुलकर्णी यांनी केलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.