_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Gahunje Crime News : आई आणि मुलाला बेदम मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या आई आणि मुलाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14) रात्री गहुंजे येथील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

राजेंद्र नारायण कांबळे, अक्षय खंडागळे, विमल नारायण कांबळे, आरती किरण खंडागळे (सर्व रा. गहूंजे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मारहाण झालेल्या महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा रस्त्याने पायी चालत घरी जात होते. गहुंजे येथील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाने ‘माझ्या आईला असे का बोलतो’ असे म्हणून जाब विचारला.

या कारणावरून आरोपी राजेंद्र याने फिर्यादी यांच्या मुलाला काचेवर फेकले. त्यानंतर आरोपी अक्षय याने काठीने पाठीवर मारहाण केली. तसेच आरोपी विमल आणि आरती यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. यात फिर्यादी आणि त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.