Gahunje : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोन हिसकावला. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी साडेसातच्या सुमारास गहुंजे ते लोढा स्कीम दरम्यानच्या डीपी रस्त्यावर घडली.

अर्चना सतीश मोहिते (वय 35, रा. काकडे सोसायटी, गहुंजे स्टेडियम जवळ, गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना यांचा मुलगा सिद्धेश, आदित्य व त्यांचा मित्र पार्थ भोसले असे तिघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. गहुंजे ते लोढा स्कीम दरम्यानच्या रोडवरून जात असताना अचानक एका दुचाकीवरून (एम एच 14 / ए एन 37) दोन इसम आले. त्यांनी सिद्धेशकडे फोन करण्यासाठी मोबाईल फोन मागितला. सिद्धेशने मोबाईल फोन देण्यास नकार आला. तरीही दोघांनी झटापटी करून सिद्धेशच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावरून चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.