Pimpri : तरुणीचा डेटिंग साईटवर नंबर टाकणारा तरूण गजाआड

एमपीसी न्यूज – तरूणीचा डेटिंग साईटवर मोबाईल नंबर अपलोड करणार्‍या तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पिंपरी येथे नुकताच उघडकीस आला.

गोरक्ष दत्तात्रय पानसरे (वय 22, रा. नारायणगाव, जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी गोरक्षने फिर्यादीचा मोबाईल नंबर डेटिंग साईटवर  अपलोड केला. यामुळे तरुणीला विविध क्रमांकावरून फोन, व्हॅाटस्अप मॅसेज आले. यामुळे त्रासलेल्या तरुणीने सायबर सेलकडे धाव घेत तरूणाविरोधात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) निकाळजे तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like