Pune Crime News : गजा मारणेच्या आणखी चार साथीदारांना गजाआड

एमपीसी न्यूज : नुकताच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या काही साथीदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणी गजा मारणे सह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटकाही केली आहे. तर काही आरोपी फरार होते. यातील आणखी चार जणांना कोथरुड पोलिसांनी जेरबंद केले.

शेखर दत्तात्रय आडकर (वय 33), अमोल विनायक तापकीर (वय 31), अमित सुरेश कुलकर्णी (वय 38) व संजय लक्ष्मण पिसाळ (वय 54) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. तर पोलिसांनी यापूर्वी गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) यांना अटक केली होती. त्यांना लागलीच जामीन मिळाला.

तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजा मारणे यांच्या समर्थकांनी अनेक गाड्यांच्या ताब्यात पुणे-मुंबई महामार्गावरून त्याची मिरवणूक काढली होती. तसेच कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही बेकायदा जमाव एकत्र केला होता. जमावबंदीचा आदेश असतानाही त्याने असे कृत्य केल्याने त्याच्या विरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली होती.  याप्रकरणी पोलीस आता त्या ताफ्यात कोण कोण होत याचा तपास करत त्यांना अटक करत आहे. त्यानुसार आज कोथरुड पोलोसानी या चौघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.