Nashik News : पंचवटी पाेलीसांच्या ‘रेड’ मध्ये जुगार अड्डे ध्वस्त

दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज : पंचवटी पोलीसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत तीन जुगार उड़े उध्वस्त करून २५ जुगारींवर कारवाई केली. या कारवाईत दीड लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

अवैधरित्या दारू विक्री करणाच्या चौघांना पकडून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५५ हजार ४१७ रूपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईची गंभीर दखल घेत पोलीसांनी अवैध धंदे सुरू असलेल्या ठिकाणचे लाईट आणि नळ कनेक्शन बंद करण्याबाबतचा पत्रव्यवहार संबधित विभागाशी केला असल्याचे समजते.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी छापा सत्र राबवून जुगार अड्डे उध्वस्त केले. ही कारवाई पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत व निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने केली. दरम्यान अवैध धंद्यासाठी कुणीही जागा उपलब्ध करून देवू नये यासाठी पोलीसांनी नवा फंडा हाती घेतला असून ज्या ठिकाणी अवैध धंदा सुरू असेल त्या ठिकाणचे नळ आणि वीज कनेक्शन रद्द करण्याचा पत्रव्यवहार महापालिका आणि वीज कंपनीकडे करण्यात आला असल्याचे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.