Pimpri : गणराया महागाई कमी करण्याची सद्बुद्धी राज्य सरकारला देवो – अजित पवार 

अजित पवार यांनी घेतल्या शहरातील गणेश मंडळांच्या भेटी 

एमपीसी न्यूज – पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाईने गरीब माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. माणूस त्रासून गेला आहे. महागाई कमी करण्याची सद्बुद्धी सरकाराला देण्याचे साकडे आपण गणरायाला घातल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.  

अजित पवार यांनी आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी दिल्या. गणरायाचे दर्शन घेतले. निगडीतील जय बजरंग तरुण मंडळाच्या गणपतीची आरती त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी सरकाराला महागाई कमी करण्याची सुद्बुद्धी सरकाराला देण्याचे साकडे गणरायाला घातले असल्याचे सांगितले.

चिखलीत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील महिला असुरक्षित आहेत. महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी राजा अडचणीत आहे. दापोडी येथून दुपारी तीन वाजता पवार यांनी गणेश मंडळाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोसरी, चिखली, चिंचवड, निगडी, आकुर्डीगाव, चिंचवडगाव, रहाटणी पिंपळेसौदागर, वाकड परिसरातील अशा 30 गणेश मंडळांना पवार यांनी भेटी दिल्या.

पवार यांच्यासोबत माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका सुमन पवळे, दत्ता पवळे, संतोष कवडे, रोहित कडेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.