Alandi : आळंदीत गणरायाचे उत्साहात आगमन

एमपीसी न्यूज : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया (Alandi) अशा गणपतीच्या जयजयकारच्या घोषात, ढोल ताशाच्या गजरात तर  टाळ मृदुंगांच्या वाद्यात पारंपरिक वेशात भगवी, सफेद टोपी, फेटा, डोक्याला पट्टी परिधान करून अति उत्साहात मंडळाच्या व घरगुती गणपतीची स्थापना आळंदीत करण्यात आली.

आज (दि.19)सकाळपासून ते दुपारपर्यंतचा शुभ मुहूर्त असल्याने बाजार पेठाही गर्दीने फुलून गेल्या होत्या. बाजारात गणपतीच्या मुर्त्या, सजावट व पूजेच्या वस्तूचे स्टॉल सजले होते. प्राण प्रतिष्ठेसाठी सकाळ ते दुपारपर्यंतचा शुभ मुहूर्त असल्याने बाजारपेठत गर्दी उसळली होती.

Bhosari : दोन तरुणांना बेदम मारहाण

विविध आकारातील, वेशातील सुंदर सुबक मुर्त्या बाजारात उपलबध होत्या. पारंपरिक वेशात नागरिक गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी आले होते. डोक्यावर सफेद अथवा भगवी टोपी, डोक्याला भगवी पट्टी अशी वेशभूषा होती.

सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाची घोषणा दुमदुमत होती. बालचमुंचा उत्साह अधिकच होता. पारंपरिक ढोल ताश्याच्या गजरात अनेकांनी गणपती बाप्पाचे स्वागत केले. सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी ही बाजारात गर्दी होती.

काही मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा सायंकाळी होत असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही (Alandi) घरच्या गणपतीसाठी सकाळचा मुहूर्त साधला. या उत्सवाचे क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यातही टिपण्यात येत होते. तर काही बाप्पां बरोबर सेल्फी घेत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.