Pune : गांधी कुटुंबीयांची नेहमीच त्यागाची भूमिका – उल्हास पवार

एमपीसी न्यूज – काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या भारत देश एकसंघ राहण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. 28 पक्षांचा पाठिंबा असताना सुद्धा त्यांनी पंतप्रधान पद नाकारले. भारतात 80 टक्के हिंदू असताना सुद्धा डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडले. गांधी कुटुंबीयांची नेहमीच त्यागाची भूमिका राहिली आहे. अत्यंत अडचणीच्या काळात भरपूर संघर्ष करून त्या पुढे आल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करून देशाचे भविष्य उज्जवल करूया, अशा शब्दांत काँगेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अखिल भारतीय काँगेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तबगार महिलांचा सन्मान काँगेस भवन येथे सोमवारी करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह, शाल, मफलर व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

अबेदा इनामदार (शैक्षणिक क्षेत्र), ऍड. शिला अंदयत्या (विधी क्षेत्र), मीना शहा (सामाजिक कार्य), सरस्वती बांदीरगे (घरकाम क्षेत्र), शीला डावरे (रिक्षा चालक), भारती औवसरे (बांधकाम मजूर क्षेत्र), अशा विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. विनोद शहा, डॉ. हेगडे, अनिल सोंडकर, बाळासाहेब दाभेकर, अंजनी निम्हण, अजित दरेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर, नुरुद्दीन सोमजी, नीता रजपूत, सुनील शिंदे, मंजूर शेख, शानी नौशात, विठ्ठल थोरात, सुजित यादव, सुरेखा खंडागळे, सुमित डांगी, शिलार रत्नागिरी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, बुवा नलावडे, साहिल केदारी, वाल्मिक जगताप, मीरा शिंदे, कल्पना भोसले, संगिता क्षीरसागर, सुंदरा ओव्हाळ, सतीश पवार, सुनील घाडगे, राहुल तायडे, पंकज घोणे, क्लेमेंट लाजरस, विकास टिंगरे, आबा जगताप, सन्मित चौधरी, अमीन शेख, राजेश शिंदे, देवेंद्र नायडू, राजू अरोरा, राधिका मखामले, कल्पना उनवणे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, अत्यंत मनापासून काँगेस पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणाऱ्या सोनिया गांधी यांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आज महिलांवर होणारे निरनिराळ्या प्रकारचे अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. पुरुष जातीतील विकृती वाढत चालली आहे. ती महिला संघटनांनी पुढे येऊन थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर, माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी रिक्षाचालक शिला डावरे यांना 51 हजार रुपयांची देणगी देऊन सोनिया गांधी यांच्या नावाने महिलांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मदत जाहीर केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.