BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: बाप्पा ! राजकीय व्यक्तींच्या घरातील…..

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात घरोघरी, सार्वजनिक मंडळामध्ये श्रीगणेशाची स्थापना केली आहे. शहरातील राजकीय व्यक्तींच्या घरी देखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणपतीसमोर आकर्षक सजावट केली आहे.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांच्या घरी देखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महापौरांच्या घरी गेल्या गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. यंदा बाप्पासमोर आकर्षक फुलांची सजावट केली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापौर जाधव म्हणाले, “यंदाचा गणेशोत्सव शहरवासियांच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि समृद्धी घेऊन येवो, अशी गणराया चरणी मी प्रार्थना केली आहे”

 

(महापौर राहुल जाधव यांच्या घरातील गणपती)

—–

शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या थेरगाव येथील घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीच्या सरबराईची आणि आदरातिथ्याची लगबग आहे. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना सुखाचा, आनंदाचा जावो, अशी प्रार्थना बारणे यांनी बाप्पाकडे केली आहे.

(मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या घरातील गणपती)

—–

भोसरीचे आमदार महेश (दादा)लांडगे यांच्या घरी गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. दादांच्या घरी अनेक वर्षांपासून गणपती बसविला जातो. यंदा झोपाळ्यावर बाप्पा विराजमान झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना, सुखाचा आनंदाचा, भरभराटीचा जावो. नागरिकांना संकटावर मात करण्याचे बळ मिळावे, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना केल्याचे, आमदार महेशदादांनी सांगितले.

(आमदार महेश लांडगे यांच्या घरातील गणपती)

———-

सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या प्रभारी उमा खापरे यांच्या निगडीतील घरी देखील गणरायाच आगमन झाले आहे. त्यांनी आकर्षक अशी आरास केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभेची प्रतिकृती केली आहे. 2019 मध्ये भाजपची सत्ता येवो. शहरातील दोन्ही लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार निवडून येवोत, असे बाप्पाला साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील घरी येऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे.

(भाजपच्या प्रभारी उमा खापरे यांच्या घरातील गणपती)

——–

उमपहापौर सचिन चिंचवडे यांच्या निवासस्थानी देखील गणरायाचं आगमन झाल आहे. शहरातील नागरिकांना अडचणीतून मुक्तता मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी मोरया चरणी केली.

(उमपहापौर सचिन चिंचवडे यांच्या घरातील गणपती)

——-

विरोधी पक्षनेते दत्ता (काका)साने यांच्या चिखलीतील घरी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. आकर्षक अशी सजावट केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोनचे संकट आहे. या संकटातून शहरवासियांची सुटका होवो. अच्छे दिनाचे गाजर दाखविणारे भाजप सरकार जाऊन आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येवो. कामगार, शेतकरी राजा सर्वांना सुख मिळावे, असे गणराया चरणी साकडे घातले असल्याचे, साने यांनी सांगितले.

(विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या घरातील गणपती)

——-

शिवसेनेचे गटनेते राहुल (दादा) कलाटे यांच्या घरी देखील गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाई देखील केली आहे.

(शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या घरातील गणपती)

मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्या घरी देखील गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. गणपतीसमोर गजारुढ मूषक ठेवण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाची पूजा करण्यात आली.

(मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्या घरातील गणपती)

HB_POST_END_FTR-A4

.