BNR-HDR-TOP-Mobile

Pune : ​डीजे वाजवूनच मिरवणूक काढण्यास गणेश मंडळ आग्रही; बाजीराव रस्त्यावर डीजे लागले लाईनला (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पण तरीही शहरातील अनेक  गणेश मंडळ डीजे वाजवण्यास आग्रही असल्याचे दिसत आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर दरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे-डॉल्बी लाईनला लावले जातात. मात्र या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर गणेश मंडळ आणि डीजे मालक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आत्ता डीजे वाजवूनच मिरवणूक काढण्यास गणेश मंडळ आग्रही दिसत आहेत. आता अशात पोलीस या मंडळांवर आणि डीजे मालकांवर काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे असणार आहे.

दरम्यान, पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील सर्वच मंडळांना नायालायाच्या निर्णयाचे पालन करण्याची विनंती करत, न्यायालयाचा निर्णय हा फक्त सणांकरिता नसून तो नागरिकांकरिता असल्याची भूमिका मांडली होती.

तर दरम्यान, शहरातील काही मंडळांकडून डीजे लावण्याचा आग्रह धरला जात आहे. डीजे पाहिजे हे म्हणणे चुकीचे आहे. नागरिकांनाही मिरवणुकीत डीजे नसवा, असे वाटत आहे. यापूर्वी शहरात डीजे लावणा-या मंडळांवर कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्वांनी शांततेत मिरवणूक पार पाडावी. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस कायद्याच्या कक्षेत राहून काम करतील. कार्यकर्त्यांनीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि विसर्जन मिरवणूक उत्साहात साजरी करावी, असे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3