Pune : तीन गणेश मंडळांतर्फे शनिवार-रविवारी बालनाट्य महोत्सव

एमपीसी न्यूज : गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या तीन गणेश मंडळांतर्फे येत्या शनिवारी (दि. 23) आणि रविवारी (दि. 24) बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत मुलांना चार दर्जेदार बालनाट्ये पहायला मिळणार आहेत. ‌‘ग्रिप्स’ पद्धतीने निर्मिती केलेली बालनाट्ये या निमित्ताने मुलांना विनामूल्य बघता येणार आहेत.

Satara : युनायटेड वेस्टर्न बँक व आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटनेचे अधिवेशन संपन्न

साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ, आदर्श मित्र मंडळ धनकवडी  (Pune) आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या बालनाट्य महोत्सवाचे ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा यांनी निवेदनाद्वारे दिली. बालनाट्य महोत्सवाचे उद्घाटन दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य निर्मात्या शुभांगी दामले यांच्या हस्ते होणार आहे.

या प्रसंगी सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार व कार्याध्यक्ष उदय जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर ‌‘मिस कम्युनिकेशन’, दुपारी 1 वाजता ‌‘चेरी एके चेरी’, दि. 24 रोजी सायंकाळी 4 वाजता ‌‘आलयं आमच्या लक्षात’ आणि सायंकाळी 5:30 वाजता ‌‘पक्का लिंबू टिंबू’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

बालनाट्य हे व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम आहे. त्याचप्रमाणे मुलांना दर्जेदार बालनाट्ये पाहता यावीत, बालनाट्याची संस्कृती मुलांमध्ये रुजावी या हेतूने बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव विनामूल्य आयोजित करण्यात आला असल्याचे पीयुष शहा यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.