Pune : गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या – संजय बालगुडे

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेशोत्सवाला केवळ सांस्कृतिक परंपरा नाही, तर त्याला स्वातंत्रपूर्व काळाचा वारसा लाभला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवरील खटले आणि गुन्हे मागे घेतले, त्याप्रमाणे गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवाला 127 वर्षांची परंपरा लाभली आहे. तथापि, सन 2000 साली ध्वनिप्रदूषणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने पारित केल्यानंतर अनेक मंडळांवर खटले दाखल झाले होते. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हयात असताना ते खटले काढून घेतले. 2014 साली आपले सरकार सत्तेत आले. 2014 ते 2018 या कालावधीत पुण्यातील साधारणतः 500 मंडळांवर खटले व गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या गणेश मंडळांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी बालगुडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.