Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी देखावे, मिरवणूक टाळावी : महापौर

Ganesh Mandals should avoid decorations and processions on the backdrop of Corona: Mayor

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे यावर्षी गणेश मंडळांनी देखावे आणि मिरवणूक टाळावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. 

आगामी गणेशोत्सवानिमित्त  महापालिकेतर्फे गुरुवारी गणेश मंडळांची आढावा बैठक आयोजित केली होती.

यावेळी पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार,  अधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मंडळांना कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवनगी दिली जाणार नाही. गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करून उत्सव साधेपणाने साजरा करावा.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या जम्बो हॉस्पिटलच्या उभारणीस हातभार लावावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.

यावर्षी गणेश मंडळांनी मंडप टाकण्याऐवजी मंदिरामध्येच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. १० दिवसांनी तेथेच पुजेच्या मुर्तीचे विसर्जन करावे, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

तर, पुणे शहारत 5 लाख गणेश मूर्त्यांचे विसर्जन होते. 15 ते 20 लाख लोक रस्त्यावर येतात. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये आणखी महत्वाच्या सूचना देण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले. दरम्यान, गणेश मंडळांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.