Pimpri News: ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गणेश पांडियनचे यश

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ॲथलिट’ गणेश पांडियन याने सुवर्णपदकांची कमाई करत घवघवीत यश मिळवले.

ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 21 चे आयोजन करनाल, हरियाणा येथील करण स्टेडियम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील रहिवासी खेळाडू ‘ॲथलिट’ गणेश पांडियन हा सहभागी झाला होता.

या स्पर्धेत त्याने उत्तुंग यशाला गवसणी घालत 110 मीटर हर्डल्स व 400 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक मिळवले. तसेच 4×400 मीटर रिले या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या यशाने पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.

या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग होता. गणेश पांडियन याच्या या यशाचे कौतुक पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी करून योग्य तो सन्मान केला.

याप्रसंगी क्रीडा अधिकारी, क्रीडा पर्यवेक्षक रज्जाक पानसरे, अनिता केदारी, विश्वास गेंगजे तसेच क्रीडा मार्गदर्शक शेखर कुदळे, रुस्तम पठाण व हॉकी महाराष्ट्र संघटनेचे जनरल सेक्रेटरी मनोज मोरे उपस्थित होते. याप्रसंगी क्रीडा मार्गदर्शक शेखर कुदळे व रुस्तम पठाण यांचाही सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.