Ganesh Utsav 2020 : वाघोली येथे गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

गणेश विसर्जन असल्यामुळे घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी तो आई आणि मित्रासह परिसरातील एका खाणीवर गेला होता.

एमपीसीन्यूज : गणेश विसर्जनादरम्यान खाणीतील खोल पाण्यात बुडून एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज, मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हवेली तालुक्यातील वाघोली येथे ही घटना घडली. दरम्यान, घटना घडल्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

कृष्णा मारुती लोकरे (वय 18) असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अग्निशमन दलाचे जवान सुहास जाधव म्हणाले, कृष्णा हा वाघोलीतील जाधव वस्ती येथे राहण्यास होता.

गणेश विसर्जन असल्यामुळे घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी तो आई आणि मित्रासह परिसरातील एका खाणीवर गेला होता.

गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी तो खाणीतील पाण्यात पोहत गेला. मूर्ती विसर्जन करुन पुन्हा पोहता येत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

तो पाण्यात बुडाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले आणि दहा मिनिटात कृष्णा याचा मृतदेह  जवानांनी बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.