Ganesh Utsav 2020 : उन्न ‘ती’च्या गणेश मूर्तीचे कार्यालयातील कृत्रिम कुंडात विसर्जन

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित उन्न 'ती'चा गणेश उत्सवाची आज, शनिवारी सांगता झाली.

एमपीसीन्यूज  : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित उन्न ‘ती’चा गणेश उत्सवाची आज, शनिवारी सांगता झाली. फाउंडेशनच्या कार्यालयातील कृत्रिम विसर्जन कुंडात  फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे व उपस्थित महिलांच्या हस्ते गणेश विसर्जन करण्यात आले.

उन्न ‘ती’चा गणपती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. उन्नती सोशल फाउंडेशनने यंदा तुरटी पासून तयार केलेलया गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. संस्थेच्या वतीने यंदा साधेपणाने गणेश उत्सव साजरा केला.

सातव्या दिवशी गणपतीची आरती  कोरोना योद्धा महिला डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले. या गणेश उत्सवाची सातव्या दिवशी सांगता करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना संकटकाळात नियमांचे पालन करत उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयातील  विसर्जन कुंडात  फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे व महिलांच्या हस्ते गणेश विसर्जन करण्यात आले.

यावेळी फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अतुल पाटील, राजेंद्र जयस्वाल, राजू देवतारे, डॉ. ओंकार बाबेल तसेच अश्विनी भिसे, कविता भिसे, डॉ. प्राजक्ता अरमरकर, मीनाक्षी देवतारे, शोभा राजगुरे, सुनीता जयस्वाल, किरंजित कौर आदी उपस्थित होत्या.

कुंदा भिसे म्हणाल्या, सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेत शाडू किंवा तुरटीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीचीच प्रतिष्ठापना करावी. सध्या कोरोनाच्या संकट काळात नियमांचे पालन करत गणेश मूर्ती घरीच विसर्जन करावी. सार्वजनिक उत्सवात मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे.

संजय भिसे म्हणाले, सध्याच्या काळात पर्यावरण रक्षण आणि संवर्धन काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण जागृतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. कोरोनावर मात करण्यासाठी शासकीय निर्देशांचे तंतोतंत पालन करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.