Ganesh Utsav 2020 : संदीप वाघेरे यांच्या संकल्पनेतील गणेश मूर्तीदानाला गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेत भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गणेश मूर्ती दान व विसर्जन रथ ही संकल्पना राबवली.

एमपीसी न्यूज – भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या गणेशमूर्ती दान आणि विसर्जन रथाला गणेश भक्तांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यासाठी असंख्य भाविकांनी पुढाकार घेतल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व गणेश भक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आणि प्रभागातील गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेत भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गणेश मूर्ती दान व विसर्जन रथ ही संकल्पना राबवली.

महापालिकेच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

परंतु, गेल्या पाच दिवसांपासून घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये चैतन्याचे रूप घेऊन विराजमान झालेल्या गणरायाचे विसर्जन कसे करावे, यावरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सुरू केलेल्या उपक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान व विसर्जन रथामध्ये विसर्जन केले. त्यामुळे पर्यावरण पूरक उत्सवाचे बीज रुजल्याचे चित्र दिसून आले.

नगरसेवक वाघेरे यांनी सुरू केलेल्या या रथाचे प्रभागातील महिला आणि गणेश भक्तांनी स्वागत केले. तसेच अनेकांनी विसर्जन रथामध्ये आपल्या बाप्पाचे विसर्जन केले.

विसर्जनाच्या पाचव्या दिवशी सुमारे 215 नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन रथामध्ये मूर्तीदान करून विसर्जन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.