Ganeshostav 2020: गणरायाला 500 पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य

यावेळी ऋषीमुनींच्या वेशातील आणि सरस्वतीच्या वेशातील मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.

एमपीसी न्यूज- सर्व कलांचा अधिपती हा गणपती आहे. या गणरायाला वंदन करण्यासाठी बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने तब्बल 500 हून अधिक पुस्तकांचा अनोखा महानैवेद्य दाखविण्यात आला. या नैवेद्याचा पुस्तकरुपी प्रसाद विविध संस्थाना आणि ग्रंथालयांना देण्यात येणार आहे. यावेळी ऋषीमुनींच्या वेशातील आणि सरस्वतीच्या वेशातील मुलांनी उपक्रमात सहभाग घेतला.

गणेशोत्सवांतर्गत मंडळातर्फे गणपतीला पुस्तकांचा नैवेदय दाखवित साहित्याची पूजा करण्यात आली.

सुनिता राजे पवार म्हणाल्या, साहित्य ही एक अशी कला आहे, ज्याने मानवी जीवन अतिशय सुंदर आणि समृद्ध होते. माणूस बनण्यासाठी आवश्यक गोष्टी साहित्यातून मिळतात.

साहित्यातील लेखन ही त्या-त्या काळाची अभिव्यक्ती आहे. लेखनातूनच इतिहास मांडला जातो आणि सांगितला जातो. प्रत्येक काळाचा प्रवक्ता साहित्य असते, असेही त्यांनी सांगितले.

पीयुष शाह म्हणाले, कोरोनामुळे मुलांना घराबाहेर पडता येत नाही. ग्रंथालये देखील बंद आहेत. त्यामुळे आज गणपतीला पुस्तकांचा नैवेद्य दाखवून साहित्याची पूजा करण्यात आली. त्याचा पुस्तकरुपी प्रसाद विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रसाद भडसावळे यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.