Ganeshotsav 2020: प्रश्न तुमचे, उत्तर पंचांगकर्ते दाते यांचे; घरी बसविलेल्या गणेशाचे मुख कोणत्या दिशेस असावे ?

गणेशाचा वर्ण शेंदरी / लाल आहे असा अनेक ग्रंथात उल्लेख आढळतो. त्यामुळे गणेशाला लाल फुले, लाल वस्त्र अर्पण केले जाते.

एमपीसी न्यूज- गणेशोत्सवात अनेक धार्मिक विधी केले जातात. त्याबाबत प्रत्येकाला उत्सुकता असते. अनेकांच्या मनात अनेक प्रश्नं असतात. भाविकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरं खास ‘एमपीसी’च्या वाचकांसाठी सुप्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहेत. आजच्या भागात काही निवडक प्रश्नं पुढीलप्रमाणे…

1. घरगुती गणेशाची मूर्ती किती उंच असावी आणि का ?

– घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एकवीत उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्यतो चिकणमाती, शाडूची असावी.

2. गणपतीला लाल रंग का प्रिय आहे ?

– गणेशाचा वर्ण शेंदरी / लाल आहे असा अनेक ग्रंथात उल्लेख आढळतो. त्यामुळे गणेशाला लाल फुले, लाल वस्त्र अर्पण केले जाते.

3. गणपतीचे विसर्जन करताना उत्तरपूजा का आवश्यक असते ?

– ज्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठापनेचा विधी असतो तसाच विसर्जनासाठी उत्तरपूजेचा विधी करावा लागतो.

4. घरी बसविलेल्या गणेशाचे तोंड कोणत्या दिशेस असावे ?

– गणेशाच्या मूर्तीचे तोंड शक्यतो पूर्व – पश्चिम असावे, मात्र तसे नसल्यास पूजन कर्त्याचे तोंड दक्षिणेकडे होणार नाही याची काळजी घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.