Ganeshotsav : अमेरिकेत भारतीयांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष

एमपीसी न्यूज – संपूर्ण देशभरात गणेशोस्तव उत्साहात साजरा होत असताना अनिवासी भारतीयांनी अमेरिकेतील शिकागो, अर्लिनहाईट्स, मिल्वाकी, कोलंबस, इलिनॉय शहरात मोठ्या जल्लोषात गणेशोस्तव साजरा केला.

Pimpri : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या सदस्यांकडून स्वच्छता दूत, वाहतूक स्वयंसेवक म्हणून सेवा

ठिकठिकाणी युवकांकडून गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यात आला. यावेळी अमेरिकन नागरिकांनाकडून इंडियन एलिफंट गॉड म्हणून गणेशोत्सवाचे आवरजून स्वागत करण्यात येत होते. मील्वाकी व शिकागो मध्ये ढोल ताशांच्याचे गजरात मिरवणूका काढण्यात आल्या. कॉलेजियन्सकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव करण्यात येत होता.

रोज सायंकाळी आरती, प्रसाद, मोदक, महाप्रसाद आयोजित करण्यात येत होते. यामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, नागपूर या शहरातील अनिवासी भारतीयांचा उस्फुर्त सहभाग दिसून आला. विकॉन्सी विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात गणेशाची स्थापना करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.

यामध्ये प्रामुख्याने नम्रता शेवाळे, अनुष्का रोडी, प्रितीशा पाटील, अथर्व दाहोत्रे, कैवल्य पातकर, तन्मय कालेकर, श्रेयस चाटे, मिहिर दीक्षित, कृष्णा सोमाणी, शुभम सोमाणी, केतकी सोमाणी, रिधान सोमाणी, कृष्ण सोमाणी, निकिता शर्मा, अंकित शर्मा, अपूर्वा अनंतवर, तन्मय सिंग, प्रतिक कोल्हे, स्नेहल कोल्हे, श्रेयश कुलकर्णी, अनिमेश पवार, शिवांजली जाधव, कौस्तुभ पातकर, अदिती पातकर यांचा मोठा सहभाग दिसून आला.

अनंत चतुर्थीला मिस्कोंसी मधील विकॉन्सी विद्यापीठातील अनिवासी भारतीयांनी कॉलेज परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले. मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भावपूर्ण नयनांनी गणेशाला निरोप दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.