Nigadi : गणेशोत्सव मंडळानी केरळला मदतीचा हात द्यावा

नगरसेवक उत्तम केंदळे यांचे गणेश मंडळांना आवाहन

एमपीसी  न्यूज  गणेशोत्सवावरील अतिरिक्त खर्च टाळून केरळला मदतीचा हात द्या; नगरसेवक उत्तम केंदळे यांचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे.माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन केरळ राज्याला मदत करू या. व यंदाचा गणेशोत्सव साध्यापध्दतीने साजरा करा असे आवाहन नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केले आहे.

आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्यात आली आहे.  त्यात अन्नाची पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट, बेडशीट्स, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादींचा समावेश आहे. तरी  गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने करावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.