Ganeshutsav 2020 : अप्सरा सोनालीच्या घरी अवतरले शंकराच्या रुपातील बाप्पा

इकोफ्रेंडली असलेल्या या गणेशमूर्तीची हळद आणि कुंकवाच्या पाण्याने सोनालीने रंगरंगोटी केली आहे.

एमपीसी न्यूज – चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. आता पुढील दहा दिवस त्याच्या आगमनामुळे घरोघर चैतन्य निर्माण होईल. महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या निगडी-प्राधिकरण येथील घरी शंकराच्या स्वरुपातील गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

सोनाली काही दिवसांपूर्वीच दुबईहून परतली आहे. त्यानंतर ती चौदा दिवस क्वारंटाईन होती. तिचा भाऊ अतुल याने ही गणेशमूर्ती बनवलेली आहे. यंदा सोनालीचे घरी गणपती तयार करण्याचे तिसरे वर्ष आहे. यंदा एक विशेष संकल्पना घेऊन तिने गणपतीची स्थापना केली आहे.

यंदा सगळ्या जगावर करोनाचे संकट कोसळलेले आहे. दररोजच्या सगळ्या कामामध्ये वारंवार याची जाणीव होत आहे. तसेच उत्सवप्रिय भारतीयांना करोनामुळे मर्यादा आल्या आहेत. हे सगळं दूर करण्यासाठी सोनालीने अभिनव पद्धतीने गणेशाला साकडे घातले आहे.

तिने शंकराच्या स्वरुपातील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे.

यामागील संकल्पना सांगताना सोनाली म्हणाली की, ‘आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना जगाचे निर्माता, तारक आणि संहारक या स्वरुपात मानतो. म्हणजे ब्रह्म्याने विश्वाची निर्मिती केली. विष्णुने त्याचे रक्षण केले आणि नंतर शिव त्याचा संहार करणारा आहे.

जगातील जे काही वाईट आहे, दुष्ट आहे त्याचा विनाश शिवाकडून केला जातो. या करोनारुपी राक्षसाचा विनाश देखील शिवाने करावा म्हणून यंदा आम्ही गणेशाला शिवस्वरुपात घडवले आहे. यंदा आमचे घरी गणपतीची मूर्ती तयार करण्याचे तिसरे वर्ष आहे’.

इकोफ्रेंडली असलेल्या या गणेशमूर्तीची हळद आणि कुंकवाच्या पाण्याने सोनालीने रंगरंगोटी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.