सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Ganeshutsav 2020 : किवळे येथे ‘सेल्फी विथ गणपती गौरी सजावट स्पर्धा’

एमपीसीन्यूज : विकासनगर- किवळे येथील श्री राजेंद्र बालालसाहेब तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘सेल्फी विथ गणपती सजावट व सेल्फी विथ गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रशस्ती पत्र, तर प्रथम चार क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तरस म्हणाले, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपती किंवा गौरीच्या सजावटीचे सेल्फी फोटो काढून 9822132069 या व्हाट्सॲप क्रमांकावर पाठवावेत.

स्पर्धेत प्रथम क्रमांकास 1 हजार 111, द्वितीय क्रमांकास 999, तृतीय क्रमांकास 777 आणि चतुर्थ क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला 555 रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी राजेंद्र तरस यांच्या विकासनगर-किवळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news